अहमदनगर

कावडीचे पाणी घेऊन जाणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू

अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर गावच्या शिवारातून कावडीचे पाणी घेऊन जाणार्‍या युवकाला बहिरोबा मळा येथे दुचाकीने धडक दिली.

या धडकेत त्या युवकाचा मृत्यू झाला. निरंजन विजय वाघ (वय 17 वाघवाडी ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत निरंजनचे वडिल विजय नानासाहेब वाघ (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. दुचाकी चालक सुर्यकांत ज्ञानदेव आवारे (रा. इमामपूर ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरंजन हा कावडीचे पाणी घेऊन चालला होता. इमामपूर शिवारात त्याला दुचाकीस्वार सुर्यकांत आवारे यांनी धडक दिली. जखमी झालेल्या निरंजनला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक आव्हाड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button