अहमदनगर

नोकरदाराने अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती दिल्याने खात्यातून गेले…

अहमदनगर- अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवरील व्यक्तीने नोकरदार राजेश शंकरराव कळसे (वय 55 रा. एकनाथनगर, केडगाव) यांना अकाउंट सेविंग व सेफ डिपॉझिट लॉकर संदर्भात माहिती देतो, असे म्हणून व्हॉटसअ‍ॅपवर पाठविलेल्या एका लिंकवर वैयक्तीक माहिती भरण्यास सांगितली. समोरच्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे माहिती भरल्यानंतर कळसे यांच्या दोन बँक खात्यातून एकुण दोन लाख 98 हजार रूपये परस्पर काढून घेत फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

राजेश शंकरराव कळसे (वय 55 रा. एकनाथनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कळसे यांना 26 डिसेंबर रोजी सायंकाळी एका अनोळखी नंबरवरून फोन आला व एचडीएफसी बँकेतुन बोलतो असे म्हणून मी अकाउंट सेविंग व सेफ डिपॉझिट लॉकर संदर्भात माहिती देतो, असे सांगितले. तो व्यक्ती कळसे यांना म्हणाला, मी तुम्हाला माझा व्हॉटसअ‍ॅप नंबरवरून एक लिंक पाठविली आहे. त्यावर तुमची माहिती भरा व एक रूपया पाठवा, असे म्हणाल्यावर कळसे यांनी ती लिंक ओपन करून त्याने सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक माहिती मोबाईलवरून भरल्यानंतर तो म्हणाला तुमची माहिती सबमिट झाली आहे, तुम्हाला 48 तासात तुमच अकाउंट सेविंग तसेच लॉकर संदर्भातल काम होईल, असे म्हणून फोन बंद केला.

 

त्यानंतर 28 डिसेंबर रोजी सायंकाळी एका अनोळखी नंबरवरून कळसे यांना फोन आला व अकाउंटबाबत माहिती विचारली. कळसे यांनी संपूर्ण माहिती सांगितली त्यानंतर पुन्हा एका अनोळखी नंबरवरून फोन आला व एक रूपया पे करण्यास सांगितल्यानंतर कळसे यांनी व्हॉटसअप लिंकव्दारे एक रूपया पे केला.

 

त्यानंतर 31 डिसेंबर रोजी सकाळी कळसे यांनी मोबाईलवर बँक बॅलन्स चेक केला तेव्हा त्यांना समजले की, त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून 15 हजार त्यानंतर चार हजार 999 रूपये तसेच आयसीआयसीआय बँक खात्यातून 99 हजार रूपये दोन वेळेस कपात झाले. त्यानंतर एक रूपया अशी एकुण दोन लाख 98 हजार एक रूपये एवढी रक्कम बँकेच्या खात्यातून परस्पर काढुन फसवणुक केली. कळसे यांनी 2 जानेवारी रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button