अहमदनगर

‘त्या’ बहुचर्चित ‘हनीट्रॅप’ प्रकरणातील आरोपींकडून फिर्यादीला मारहाण

अहमदनगर- ‘हनीट्रॅप’ प्रकरणातील आरोपींकडून पीडित फिर्यादी व्यक्तीला मारहाण करून लुटण्यात आले. नगर-कल्याण महामार्गावर ड्रिम सिटी अपार्टमेंटसमोरील एका गॅरेजमध्ये ही घटना घडली.

 

जखणगाव (ता. नगर) येथील एका महिलेच्या माध्यमातून काही जण धनदांडग्या व्यक्तींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असतात. त्या आधारे व्हिडिओ शुटिंग काढून संबंधित व्यक्तीकडून खंडणी वसूल करत असत. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

याप्रकरणी फिर्याद देणार्‍या एक व्यावसायिक शुक्रवारी (दि.13) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील ड्रिम सिटी अपार्टमेंटसमोरील एका गॅरेजमध्ये आपल्या वाहनाची दुरुस्ती करीत होता.

 

त्यावेळेस त्या ठिकाणी आरोपी बापू बन्सी सोनवणे (रा. हिंगणगाव, ता. नगर) हा वाहनातून आला. संबंधित व्यावसायिकास तू आमचे नाव पोलिसांना का दिले, त्यामुळे माझे चार ते पाच लाख रुपयांचा खर्च झाला आहे, असे म्हणून बापू सोनवणे व त्याच्याच बरोबर आलेले आरोपी नवाज पटेल, फिरोज शेख (दोघे रा. जखणगाव), दिलावर शेख (रा. शेखवस्ती, निमगाव फाटा), अक्षय पाडळे (रा. हिंगणगाव) व इतर अनोळखी दोन ते तीन व्यक्तींनी भांडण सुरू केले.

 

त्यावेळेस या व्यवसायिकाच्या मित्राने भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असतांना बापू सोनवणे आणि त्याच्या सहकार्‍यांनी या व्यवसायिकाला मारहाण केली. त्यांच्या खिशातील 28 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच गळ्यातील तीन तोळे वाजण्याची सोन्याची चैन (किंमत 66 हजार) काढून घेतली. या झटपटीमध्ये सुमारे 94 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला आहे. याबाबत व्यवसायिकांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button