अहमदनगर

धान्याचा ट्रक पळवून नेणार्‍या आरोपीला पोलिसांकडून अटक

नगर तालुका पोलिसांनी धान्याचा ट्रक पळवून नेणार्‍या आरोपीला अटक केली आहे. योगेश वाकडे (रा. शेवगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली असून याप्रकरणी विकास अनाजी शेळके (वय 42 रा. शिरूर जि. पुणे) यास अटक करण्यात आली आहे.

आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, 22 मार्च, 2022 रोजी दुपारी अहमदनगर-पुणे रोडवरील कामरगाव (ता. नगर) शिवारात तिघांनी वाकडे यांच्याकडील 14 लाख 30 हजार रूपये किंमतीचा ट्रक मका धान्यासह पळवून नेला होता.

याबाबत वाकडे यांनी 24 मार्च, 2022 रोजी नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेतला.

आरोपी शेळके याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून धान्यासह ट्रक ताब्यात घेतला आहे. दरम्यान शेळके याचे दोन साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button