अहमदनगर

बसमधील प्रवाश्यांचे सामान चोरणाऱ्या परराज्यातील आरोपीला पोलिसांकडून अटक

खासगी बसमधून प्रवास करणार्‍या व्यक्तीच्या बॅगमधून सोन्यासह रोकड चोरणाऱ्या एकास नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. असलम खा अली हुसेन खा (वय 42 रा. मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली मात्र दोघे जण पसार झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, रोशन हरीभाऊ जवजाळ (वय 34 मुळ रा. कांडली परतवाडा ता. अचलपुर जि. अमरावती, हल्ली रा. हडपसर, पुणे) हे कुटूंबासह ट्रव्हल्स बसने प्रवास करत होते. अहमदनगर-पुणे बस प्रवासादरम्यान बस कामरगाव शिवारात एका हॉटेल मध्ये थांबली.

त्यावेळी चोरट्यांनी जवजाळ यांच्याकडील बॅग लंपास केली. बॅगमध्ये सोने, रोख रक्कम, तसेच इतर महत्वाचे कागदपत्रे असा दोन लाख 30 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. जवजाळ यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी असलम खा अली हुसेन खा (वय 42 रा. मध्यप्रदेश) याला अटक केली आहे. दरम्यान अशा चोरट्यांपासून सावधानता बाळगा, असे आव्हान सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button