अहमदनगर

सात दुचाकींची चोरी करणारा आरोपी अखेर पोलिसांकडून गजाआड

नगर शहरातील तोफखाना पोलीसांनी दुचाकी चोर पकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त करण्याची कारवाई तोफखाना पोलीसांनी केली आहे.

विकास खरपुडे, (रा. बुरुडगावरोड, चोरेमळा, श्रीरामनगर, अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्याचे नाव आहे. तोफखाना पोलिसांचे पथक हद्दीमध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरणाऱ्या आरोपींचा शोध घेते.

आरोपींचा शोध सुरू असताना आरोपी विकास खरपुडे याने शहरातील पाईपलाईन रोड येथून दुचाकी चोरी केली असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे तोफखाना पोलिसांच्या पथकाने आरोपी खरपुडे याचा शोध घेतला असता तो त्याच्या राहत्या घरी मिळून आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे दुचाकी चोरीसंदर्भात विचारपूस केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी खरपुडे याने नगर शहरासह पुणे जिल्ह्यातून सात दुचाकींची चोरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button