अहमदनगर

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी अक्षय अशोक भिंगारदिवे (वय २२ वर्षे , रा . शिवाजीनगर केडगाव, अहमदनगर) याला १ महिना सक्तमजुरी व २,००० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी (वय १४ वर्षे) ही क्लासेस येथुन तिचे घरी पायी जात असताना आरोपी अक्षय भिंगारदिवे व त्याचा मित्र हे मोटारसायकवरून पिडीत मुलीच्या पाठीमागुन आले.

आरोपीने सदर मोटारसायकल ही पीडित मुलीच्यासमोर आडवी लावुन तिची छेड काढली. मात्र मुलीने प्रतिसाद न देता ती निघून गेली. त्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या घरी सांगितला.

Advertisement

त्यानंतर पीडित मुलीचा भाऊ व त्याचा मित्र हे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी एके ठिकाणी भेटला. पिडीत मुलींच्या भावाने आरोपीला जाब विचारला असता आरोपीने रस्त्यावरील दगड उचलुन त्याच्या डोक्यात मारला व आरोपी तेथुन पळुन गेला .

सदर घटनेबाबत पीडितगेच्या कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या फिर्यादीनुसार आरोपीविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button