अहमदनगर

कुऱ्हाडीचे घाव घालत खून करून पसार झालेला आरोपी बडे जेरबंद!

पाथर्डी  तालुक्यातील वडगांव येथे कु-हाडीने वार करून भागवत गर्जेे यांचा निर्घृण खून करून पसार झालेला मिठू उर्फ भागवत बडे याला पाथर्डी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भागवत गर्जेे खून प्रकारणात अधिक तपास करावयाचा आहे,

यामुळेच आरोपी बडे याची न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी पाथर्डी पोलिसांनी केली होती. या सुनावणी दरम्यान आरोपी बडे याला बुधवार (दि.५) पर्यंत न्यायालयाने  पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान सामायिक विहिरीचे पाणी घेण्यावरून आरोपी बडे व मयत गर्जे यांच्यात वाद झाले होते. हा राग मनात धरून बडे याने भागवत गर्जेे यांच्या डोक्यात ,

छाती , हातावर कु-हाडीने वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बडे याने मयत गर्जे यांचा मृतदेह विहिरीत टाकून तो पसार झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button