‘ड्राय डे’ च्या दिवशी अकोल्यात अवैध दारू तस्करांवर कारवाई

महाराष्ट्र दिना निमीत्त ड्राय डे असल्याने अकोले शहरात व परिसरात अवैधरित्या दारुची विक्री होत होती. याबाबत अकोले पोलिसांना माहिती समजताच त्यांनी शहरात व परिसरात अवैध दारुची साठवणूक व विक्री करणार्या विविध ठिकाणांवर छापे टाकले.
या छाप्यात 20 देशी दारुचे बॉक्स पकडून एकूण 56 हजार 760 रुपंयाचा देशी दारुचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या छाप्यात अनेकांना अटक करण्यात आली .
तर दाखल गुन्ह्यातील आरोपींपैकी 3 आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये केली आहे.
यांच्यावर गुन्हे दाखल यामध्ये धनेश्वर काशिनाथ पवार (रा. आंबेडकर नगर, अकोले), विलास शंकर पवार (रा. सुभाष रोड, ता. अकोले), सतीश विलास पवार (रा. सुभाष रोड, ता. अकोले), उषा शेटीबा पवार (रा. शाहुनगर), माधुरी गायकवाड (रा. कारखाना रोड, ता. अकोले) यांचे विरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन आपले गावात किंवा परिसरात कोठेही अवैध रित्या दारुची विक्री अथवा वाहतूक होत असेल तर तात्काळ पोलीस ठाणेस कळवा, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येत आहे.