अहमदनगर

‘या’ सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे करणार्‍या एका आरोपीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. निलेश सुनील पेंडूलकर (वय 25 रा. पाटील गल्ली, भिंगार) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी पेंडूलकरला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत नाशिकच्या कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबद्ध केले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.

निलेश पेंडूलकर हा भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे करत होता. त्याच्याविरूध्द मारहाणीचे चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने सहायक निरीक्षक देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.

चार महिन्यापूर्वी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार आरोपी पेंडूलकर याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button