लेटेस्ट

राज कुंद्राच्या अडचणीत भर…पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा याच्या पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहेत. ईडीने राज कुंद्रांविरोधात फेमा (Foreign Exchange Management Act) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने राज कुंद्रांना पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने राज कुंद्राविरुद्ध (Raj Kundra) गुन्हा नोंदवला आहे. पॉर्न रॅकेट प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या फेब्रुवारी 2019 मध्ये, राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि हॉटशॉट्स नावाचे अॅप विकसित केले.

यूकेस्थित कॅनरीन कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे राज कुंद्राचे मेहुणे आहेत. मात्र या हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी राज कुंद्राच्या कंपनी विहानने केनरिन कंपनीशी करार केला होता.

तसंच या देखभालीसाठी विहान कंपनीच्या 13 बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार झाले. हॉटशॉट्स अॅप हे खरं तर पॉर्न फिल्म्ससाठी एक प्लॅटफॉर्म होतं.

ज्यामध्ये भारतात पॉर्न फिल्म्स बनवल्या जायच्या आणि हॉटशॉट्स अॅपवर लोड केल्या जायच्या आणि सबस्क्रिप्शन विकल्या जायच्या. सब्सक्राइबरच्या माध्यमातून मिळालेली मोठी रक्कम राज कुंद्राच्या कंपनी विहानमध्ये मेंटेनन्सच्या नावावर केली जात होती आणि अशा प्रकारे यूकेमधून फिरणाऱ्या पॉर्न फिल्म्समधून मिळणारा पैसा मेंटेनन्सच्या नावावर राज कुंद्राच्या कंपनीच्या खात्यात यायचा.

राज कुंद्रा यांच्या विहान कंपनीशी संबंधित सर्व बँक खात्यांमध्ये पॉर्न चित्रपटांच्या कमाईतून झालेले उच्च प्रमाणातील व्यवहार ईडीच्या हाती लागले आहे. त्यानुसार ईडीने राज कुंद्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अश्लील चित्रपट बनवणं आणि ते मोबाईल अॅपवरून प्रसारित केल्याप्रकरणी राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर असून ईडीने मोठा झटका देत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button