अहमदनगरताज्या बातम्या

तब्बल पाच महिन्यानंतर कालीचरण महाराजांवर नगरमध्ये गुन्हा दाखल

Ahmednagar News : शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराफ यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्‍तव्य केल्याप्रकरणी तब्बल पाच महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात सकल हिंदू समाजातर्फे १४ डिसेंबर २०२२ ला हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला कालीचरण महाराज आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी उपस्थित होते. यावेळी कालीचरण महाराज यांनी दिल्लीगेट येथे मोर्चानंतर झालेल्या सभेत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्‍तव्य केले होते.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी (दि. ९) रात्री पोहेकॉ अजय गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून कालीचरण महाराज यांच्या विरोधात १५३ (अ) आणि ५०७ (२) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान कालिचरण महाराज हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कालिचरण हे आपल्या भाषणांतून अनेकदा वादग्रस्त विधान करतात यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली आहे. यापूर्वीही कालिचरण महाराज यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल झाले आहे.

आक्षेपार्ह वक्तव्य तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल अशा गोष्टींमुळे वादाच्या केंद्रस्थानी असलेले कालिचरण यांच्याविरोधात अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button