लेटेस्ट

सनी लिओनीनंतर आता राजकुमार रावची फसवणूक

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनंतर आता अभिनेता राजकुमार राव याच्या पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करत कर्ज उचलले आहे. पॅन कार्डशी छेडछाड करत माझ्या नांवावर कर्ज घेतल्याचे राजकुमार राव याने म्हटले आहे.

राजकुमार राव याने याबाबत ट्वीट केले…
माझ्या पॅन कार्डचा दुरूपयोग करण्यात आला आहे. माझ्या नांवावर छोटे कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे माझ्या  सिबिल स्कोरवर परिणाम झाला आहे.

कृपया हे दुरुस्त करून त्याविरूद्ध सावधगिरीचे उपाय करा, अशी विनंती क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) कडे करण्यात आली आहे. परंतु, सिबिलच्या अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

दरम्यान, याआधी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या पॅन कार्डचा गैरवापर करत तिच्या नांवावर २ हजार रूपये कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला होता.

त्यामुळे तिच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम झाला होता. याबाबत आरोप करताना पॅन कार्डचा गैरवापर करत धनी अॅपवरून कर्ज घेतल्याचे सनीने म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button