अहमदनगर

लग्नानंतर रणबीर आलियाला ‘या’ ठिकाणी पाहून सासूबाई झाल्या हैराण

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्ट यांचा नुकताच १४ एप्रिलला विवाह संपन्न झाला. अत्यंत घरगुती समारंभात झालेल्या या लग्नाचे फोटो सोशलमीडियावर पोस्ट झाले.

ही जोडी सध्या एकमेकांची कंपनी एन्जॉय करत घरीच थांबली असताना हुनरबाज या रिअॅलिटी शोच्या मंचावर होस्ट भारती सिंग हिने रणबीरची आई नीतू कपूर यांची मुलगा आणि सुनेशी भेट घालून त्यांना धक्काच दिला.

रणबीर आणि आलियाच्या लग्नाची धामधूम संपताच कपूर आणि भट्ट कुटुंबातील प्रत्येकजण त्यांच्या कामात लागला आहे. फक्त रणबीर आणि आलिया ही जोडी सध्या त्यांच्या वास्तू या घरात एकमेकांच्या सहवासात रमली आहे.

नुकतीच नीतू यांनी त्यांच्या डान्स दिवाने ज्युनिअर या शोच्या प्रमोशनसाठी हुनरबाज या शोमध्य हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत दिग्दर्शक आणि कपूरांचा फॅमिली फ्रेंड करण जोहर हादेखील उपस्थित होता. या शोमध्ये नीतू सिंग यांनी भरपूर धमाल केली.

हुनरबाज या शोची होस्ट कॉमेडीक्वीन भारती सिंग हिने नीतू यांचे स्वागत तर केलेच पण बोलता बोलता आता आपण भेटूया बॉलिवूड कपल रणबीर आणि आलिया यांना असे म्हणत त्यांचेही स्वागत केले. आता मुलगा आणि सून घरी असताना अचानक या मंचावर कसे आले असा प्रश्न नीतू यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

तेवढ्यात रणबीर आणि आलिया यांचे कपललूकमधील कटआउट पोस्टर मंचावर अवतरले. त्यावेळी भारती म्हणाली, या स्पेशल लग्नात आम्ही आलो नसलो तरी त्यांच्या लग्नाचा माहोल आपण या मंचावर नक्कीच आणू शकतो. लग्नात जी धमाल आम्ही करू शकलो नाही ती आता करणार आहोत असं म्हणत बद्री की दुल्हनिया या गाण्यावर सर्वांनी ठेका धरला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button