बाजारभाव

कांदा लिलावानंतर सर्व जबाबदारी खरेदीदाराने घ्यावी

शेतकऱ्यांनी मोकळा कांदा विक्रीसाठी आणल्यानंतर व लिलाव झाल्यानंतर हमाली व मापाई चा खर्च शेतकऱ्यांकडून न घेता खरेदीदाराकडून घ्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेकडून बाजरसमितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे.

मोकळ्या कांद्याची विक्री श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट मधे व्हावी, अशी मागणी केली होती.त्यावर शेतकरी व व्यापारी वर्गाची असल्याने बाजार समिती व्यवस्थापनाने २५ जानेवारी रोजी शेतकरी व्यापारी व संचालक मंडळ अशी संयुक्त बैठक घेतली होती.

त्या बैठकीत अधिकारी व्यापारी यांनी असा व्यवहार होणाऱ्या बाजारसमित्यांमधे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन नियमावली तयार करण्याचे ठरले होते.

त्यानुसार बाजार समितीचे कांदा विभागाचे साहेबराव वाबळे, संचालक मनोज हिवराळे यांचेसह या विभागातील कर्मचाऱ्यांनी विंचूर, वैजापूर, कोपरगाव आदी ठिकाणी भेटी दिल्या.

त्यावर १७ मार्च रोजी बाजारसमिती कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व बाजार समितीचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले, तालुका अध्यक्ष दत्तात्रय लिप्टे, उपाध्यक्ष राजेंद्र भांड, सरपंच प्रभाकर कांबळे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप, बाळासाहेब बडाख आदी शेतकरी तसेच संचालक हिवराळे,

कांदा विभाग अधिकारी साहेबराव वाबळे, सचिव किशोर काळे उपस्थित होते. त्यावेळी मोकळ्या कांद्याचा लिलाव झाल्यानंतर खाली केलेला कांदा परत वाहनात भरणे, त्याचे वजन करणे व खरेदीदाराच्या शेडमध्ये पोहचवणे आदी खर्च शेतकऱ्याला करावा लागतो. मात्र, कांदा विक्री झाले की सर्व जबाबदारी खरेदीदाराने घ्यावी, अशी मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button