अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पुणे महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; पाच…

अहमदनगर- नगर- पुणे महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अपघात सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी पहाटे जातेगाव घाटात (ता. पारनेर) एक भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पाच जण जखमी झाले आहे.

 

जातेगाव घाटातील हाॅटेल विनायक स्मृती येथुन माल ट्रक (MH 12 FZ 3287) हाॅटेल कडून रस्ता ओलांडून पुण्याच्या दिशेला वळत असताना अहमदनगरहून पुण्याच्या दिसेने इनोव्हा कार (MH 43 L 4434) ट्रकवर आदळली.

 

या अपघात दरम्यान अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या खाजगी बस (MP 41 T 1564) चालकाच्या नजरेस समोर अपघात झाल्याचे निदर्शनास आले.

 

त्याने प्रसंगासवधान राखून ५० ते १०० फुट बस रस्ता दुभाजकावर ओढली व समोरील कारमधील चार ते पाच व्यक्तीचे प्राण वाचवले. खाजगी बस चालकाने गाडी दुभाजकावर घातली नसती तर ट्रक व लक्झरीच्यामध्ये आलेय कारचे व त्यामधील प्रवाशाचे मोठे नुकसान झाले असते. या अपघातात पाच जण जखमी झाले असुन त्यांना सुपा पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button