अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: वाहनाच्या धडकेने दुचाकीने घेतला पेट; शिक्षकाचा मृत्यू

अहमदनगर- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील शिक्षक भाऊसाहेब तुळशीराम गमे (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने वाहनासह पोबारा केला. अपघात ऐवढा भीषण होता की वाहन चालकाने दुचाकी 100 फुट फरफटत नेली. त्यात दुचाकीला आग लागुन तीने पेट घेतला.

 

भाऊसाहेब तुळशीराम गमे हे नाशिक जिल्ह्यातील गाडगे महाराज आश्रम शाळेत मुख्याध्यापक होते. या अपघाताची माहिती केलवड चे पोलिस पाटील सुरेशराव गमे यांनी राहाता पोलिसांना दिली. मयत यांचे बंधू नामदेव तुळशीराम गमे यांनी राहाता पोलिसांत खबर दिली.

 

मयत भाउसाहेब तुळशीराम गमे हे आपल्या मुळ गावी केलवड येथे 17 नोव्हेंबर रोजी आले होते. काल शुक्रवारी काही कामानिमित्त राहाता येथे गेले होते. राहात्यावरुन केलवड च्या दिशेने परतत असताना दहेगावच्या शिवारात केलवड कडून येणार्‍या वाहानाने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातच ते जागीच ठार झाले.

 

त्या वाहनाने धडक देवुन वेगाने जात असताना मयत गमे यांची दुचाकी घटनास्थळापासुन 100 फुट अंतरावर फरफटत नेली. गाडी रस्त्याच्या साईडला पडून तीने पेट घेतला. त्यात ही दुचाकी जळून खाक झाली.

 

दरम्यान अपघातानंतर राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी तात्काळ अपघात स्थळी पाहाणी केली. केलवड व दहेगाव येथील ग्रामस्थ अपघात स्थळी जमले होते. राहाता पोलिसांनी या अपघात प्रकरणी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे. 83/2022 सीआरपीसी 174 नुसार अकस्मात दाखल केला आहे.

 

या अपघाताचा अधिक तपास राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरोडे हे करत आहेत. दरम्यान गमे यांच्या अपघाती निधनाने केलवड गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button