अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

अहमदनगर- अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूण संतोष अर्जुन भुजबळ (रा. माका ता. नेवासा) यांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील धनगरवाडी फाटा (ता. नगर) येथे हा अपघात झाला. या प्रकरणी बाबासाहेब अर्जुन भुजबळ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष भुजबळ हे त्यांच्याकडील दुचाकीवरून अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरून प्रवास करत असताना दुपारी 12 वाजेच्या सुमारास धनगरवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. या धडकेत संतोष यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक संदीप आव्हाड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button