अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: रस्त्यावरून दुचाकी घसरली; एक युवक ठार, एक जखमी

अहमदनगर- रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक आतिष सुरेश आजबे (वय 24 रा. एकनाथनगर, केडगाव) याचा मृत्यू झाला आहे, तर अथर्व विजय सपकाळ (वय 20 रा. गवळीवाडा, भिंगार) हे जखमी झाले आहेत.
सपकाळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अथर्व सपकाळ व आतिष आजबे हे त्यांच्या दुचाकीवरून आयुर्वेद कॉर्नरकडून बोल्हेगावकडे जात असताना नेप्तीनाक्याकडे जाणार्या रस्त्यावरील बाबावाडीजवळ चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून दुसरी चारचाकी गाडी आल्याने आतिषने दुचाकीचे ब्रेक मारले.
ब्रेक मारल्यामुळे दुचाकी रस्त्यावरून घसरली. या अपघातात आतिषचा मृत्यू झाला असून अथर्व जखमी झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.