अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: बोलेरो-दुचाकीच्या भीषण अपघातात…

अहमदनगर- बोलेरो व दुचाकीच्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. राहुरी कृषी विद्यापीठ पेट्रोलपंपाशेजारी नगर-मनमाड महामार्गावर हा अपघात झाला.
बालकदास महाराज गोलवाले मुळ झाशी येथील असून सध्या तीन महिन्यापासून ते राहुरी तालुक्यातील मांजरी येथील चंद्रगीरी देवस्थान येथे वास्तव्यास होते. ते नगरहून राहुरीकडे येत असताना विद्यापीठाच्या पेट्रोलपंपाकडे पेट्रोल भरण्यास वळाले असता अचानक राहुरीकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणार्या बोलेरो गाडीने त्यांच्या दुचाकीला उडवले.
त्यानंतर बोलेरो गाडी ने पलट्या खाऊन बोलेरो गाडी शेजारील साईडगटारात पडली. या भीषण अपघातात बालकदास महाराज गोलवाले व बोलेरो मधील दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णवाहिकेतून नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये महाराजांची परीस्थीती चिंताजनक असल्याचे समजते.