अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पुलावरून कार कोसळली; एकाच कुटुंबातील…

अहमदनगर- भरधाव वेगातील कार पुलावरील कठडा तोडून खाली कोसळली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्या सर्वांवर नगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नगर-पुणे महामार्गावर रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कामरगाव (ता. नेवासा) शिवारात स्माईल स्टोन हॉटेल जवळ हा भीषण अपघात झाला.

 

अपघातात जखमी झालेले कुटुंब मुळचे अमरावती येथील राहणारे आणि नोकरीनिमित्त पुणे येथे स्थानिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची नावे समजू शकली नाही. हे कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे जात होते.

 

सकाळी ६ च्या सुमारास कामरगाव शिवारात स्माईल स्टोन हॉटेल जवळ असलेल्या वळणावर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकली.त्यात पुलाचा कठडा तुटला व कार पुलावरून खाली २० ते २५ फुट कोसळली. सुदैवाने पुला खाली झाडे झुडुपे असल्याने कार त्यांना अडकत खाली जावून आदळली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button