अहमदनगर ब्रेकींग: कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, दोन जखमी

अहमदनगर- कंटेनरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. अहमदनगर- पुणे महामार्गावर वाडेगव्हाण (ता. पारनेर) शिवारात ही घटना घडली. गंगुबाई बाबुराव सातपुते (वय 58 रा. देऊळगाव सिद्धी ता. नगर) असे मयत महिलेचे नाव आहे.
बुधवारी दुपारी दुचाकीवर मुलगा, त्याची आई व छोटी नात शिरुरकडून नगरच्या दिशेने येत असतांना वाडेगव्हाण शिवारात हॉटेल फाऊटन समोर कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील मुलगा व नात एका बाजुला पडले तर आई एका बाजुला पडल्या व त्यांना कंटेनरने चिरडले. यात गंगुबाई बाबुराव सातपुते या जागीच ठार झाल्याचे सुपा पोलीसांनी सांगितले.
अहमदनगर पुणे महामार्गावर गेल्या महिनाभरात रोज अपघात होत असुन या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे यांनी पुढाकार घेत तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याना चांगलेच फैलावर घेऊन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सात दिवसाचा अल्टीमेट दिला आहे. यावेळी महामार्गाशी संबंधित वरीष्ट अधिकारी उपस्थित होते.
या महामार्गावर रोज अपघात होत असुन येथे अलिकडच्या काळात 23 व्यक्ती मृत पावल्या असुन बुधवारी एक आजुन अपघात होऊन एका महिलेचे प्राण गेले आहेत. हा आकडा आज 24 झाला आहे.