अहमदनगरताज्या बातम्यासंगमनेर

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कदम याचा मुंढे वस्तीनजिक ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Ahmadnagar Braking : संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारात निळवंडे उजव्या कालव्याचे जोरदार काम सुरु असून यांच गावातील विजय विनायक कदम ( वय २५) हा तरुण याठिकाणी ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता.

सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कदम याचा मुंढे वस्तीनजिक ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की, विजय विनायक कदम हा तरुण मागील काही दिवसांपासून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. कामावरील साहित्य तसेच मंजूरांची तो ने-आण करण्याचे काम करत असे.

Advertisement

सोमवारी आश्वी बुद्रक येथील आठवडे बाजारासाठी तो मंजूराना ट्रॅक्टर मधून घेऊन गेला होता. रात्री उशीरा ९.३० वाजेच्या सुमारास मंजूरांना पिंप्री – लौकी येथे सोडल्यानंतर पानोडी येथील आपल्या घराकडे विजय टॅक्टर घेऊन चालला होता.

कदम हा मुंढे वस्तीनजिक वळणावर टॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला व त्याखाली विजय दबला गेला. या रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ कमी असल्यामुळे विजयला मदत मिळू शकली नाही. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, समजलेल्या माहितीनुसार विजयच्या घरची परिस्थिती गरिबीची असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण व चुलते, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात व दुर्दैवी मृत्यूमुळे पानोडीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. तर पोलिसांशी संपर्क केला असता याबाबत काहीही दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button