अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: रेल्वे इंजिनची धडक बसून शेतकर्‍याचा मृत्यू

अहमदनगर- नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर चाचणी घेणार्‍या रेल्वे इंजिनची धडक बसून नाराणडोह (ता. नगर) येथील शेतकरी पांडुरंग दौलत साठे (वय 76 रा. नारायणडोह) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याच्या एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

साठे हे नारायणडोह शिवारात नव्याने टाकण्यात आलेल्या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅक नजिक आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले असता हा अपघात घडला. गायी चरत चरत रेल्वे रुळावर आल्या असता चाचणी घेणारे रेल्वे इंजिन समोरून आले.

 

त्यापासून आपल्या गायींना वाचविण्यासाठी पांडुरंग साठे पुढे झाले, मात्र ते गायीला तर वाचवू शकले नाहीत, उलट त्यांनाही आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर मयत पांडुरंग साठे यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button