अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: उड्डाणपुलावर कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात; दोन तरूण ठार

अहमदनगर- कार डिव्हायडरला धडकून तीन-चार वेळा उलटली. या भयंकर अपघातात कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर उड्डाणपुलावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

 

अभिषेक साहेबराव रहाणे (वय 29, रा.चंदनापुरी, ता.संगमनेर), प्रथमेश विकास कुरकुटे (वय 23, रा.कुरकुटवाडी, बोटा, ता.संगमनेर) अशी अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे असून विजय तबाजी काळे (वय 35, रा.पावबाकी रस्ता, संगमनेर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

रहाणे, कुरकुटे आणि काळे हे तिघेही कारमधून संगमनेरकडे येत होते. हे तिघेही वाढदिवसासाठी चालले होते. ते कार घेऊन संगमनेर शहराच्या जवळ असलेल्या हिवरगाव पावसा शिवारात आले. उड्डाणपुलाहून जात असताना कार डिव्हायडर धडकून थेट खाली कोसळली.

 

त्यानंतर कार तीन-चार वेळा उलटल्याने कारमधून प्रवास करणारे तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. परंतू रक्तस्त्राव अधिक होऊन अभिषेक रहाणे आणि प्रथमेश कुरकुटे या दोघांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या विजय काळे या तरुणाला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button