अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दुचाकी झाडावर आदळून भीषण अपघात; दोन विद्यार्थी ठार

अहमदनगर- दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शेंडी बायपास शिवारातील वेदांत हॉटेलजवळ पहाटेच्या वेळी हा अपघात झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

अजय मनोज गोमारे (वय 25 रा. आदर्श कॉलनी, लातूर) व आशिष पवन सेठी (वय 20 रा. शिर्डी) असे मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. अजय मनोज गोमारे व आशिष पवन सेठी हे दोघे विळद (ता. नगर) येथील डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते.

 

ते गुरूवारी पहाटे त्यांच्याकडील स्पोर्ट दुचाकीवरून प्रवास करत होते. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली. अजय व आशिष यांना उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस अंमलदार विजय नवले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button