अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: टॅकर-दुचाकीचा भीषण अपघात; बाप-लेकीचा मृत्यू, मुलगा गंभीर

अहमदनगर- दोन दुचाकी- टॅकरच्या अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी श्रीरामपूर शहरानजीकच गायकवाड वस्ती या ठिकाणी अपघात झाला.

 

आज सकाळी 8 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड (४५), अजित बाळासाहेब गायकवाड (वय 20) व दीपाली बाळासाहेब गायकवाड (वय 18) हे तिघे दुचाकीवरून पढेगावकडे जात असताना शहरानजीकच गायकवाड वस्ती या ठिकाणी दोन दुचाकीची समोरासमोर धडक होवून मुलगी दिपाली दुचाकीवरून पडून बेलापूरकडे जाणा-या मळीच्या टॅकरखाली येवून जागीच ठार झाली.

 

दुचाकीवरील वडील बाळासाहेब व मुलगा अजित गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी श्रीरामपूरातील साखर कामगार रुग्णालयात नेत असताना वडील बाळासाहेब यांचा मॄत्यू झाला. तर मुलगा अजित याचेवर प्राथमिक उपचार करुन त्यास पुढील उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मळीचा टॅकर व दुचाकी पोलीस ठाण्यात आणले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button