अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कचरा गाडीची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी

अहमदनगर – दुचाकीला महापालिकेच्या कचरा गाडीने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे. अशोक शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो कुठला रहिवासी आहे, याबाबत माहिती समजू शकली नाही.

 

दरम्यान त्याच्या सोबत असलेला आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. आज, गुरूवार दुपारी बारा वाजता नगर शहरातील सक्कर चौकात हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतूकीचे नियोजन नसल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button