अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू

अहमदनगर- ट्रकच्या धडकेने वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना आज नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर बस स्थानकाजवळ घडली. विमल कारभारी शिंदे (वय 70) असे मयत वृद्धेचे नाव आहे. नागपंचमीच्या दिवशी हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

संगमनेर तालुक्यातील ओझर येथे राहणारे कारभारी शिंदे हे आपली पत्नी विमल शिंदे यांच्यासह दुचाकीहून संगमनेरला आले होते. संगमनेर बस स्थानकाजवळ या वृद्ध दाम्पत्याच्या वाहनाला रस्त्यावरील दुसर्‍या वाहनाचा धक्का लागल्याने वृद्ध महिला खाली पडली. यावेळी महामार्गावरून जाणार्‍या मालवाहतूक ट्रकखाली सदर महिला सापडली. या अपघातात सदर महिलेला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे आपल्या सहकारी कर्मचार्‍यांसह अपघात स्थळी पोहोचले. यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत जखमी असलेल्या कारभारी शिंदे यांना रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button