अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अज्ञात वाहन- दुचाकी धडकेत एक ठार

अहमदनगर- अज्ञात वाहन- दुचाकी धडकेत एकाचा मृत्यू झाला. विठ्ठल शामराव काळे (वय 55) रा. सोनाळवाडी, कर्जत असे मयताचे नाव आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील खेडनजीकच्या चंद्रभामा पेट्रोलपंपाजवळ घडली.

 

अपघात झाल्यानंतर काही वेळातच स्थानिक लोकांनी काळे यांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. मयताचे भाऊ संतोष शामराव काळे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button