अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पोलीस अंमलदाराचा मृत्यू

अहमदनगर- अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पोलीस अंमलदार अनंथा बंडू गायकवाड यांचा मृत्यू झाला. अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल परीसरात ही घटना घडली.

 

याबाबत राजेंद्र सुभाष दाणी (वय 41 रा. वांजोळी ता. नेवासा) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, रविवार दिनांक 4 रोजी सायंकाळी 7.15 वाजता अनंथा बंडू गायकवाड (वय 48 रा. धोत्रे ता. पारनेर) हे औरंगाबाद- नगर हायवे रोडवर नगरचे दिशेने रोडच्या डाव्या बाजूने जात असताना हॉटेल मातोश्रीसमोर पांढरीपुल शिवारात, त्यांचे पाठीमागून येणार्‍या कुठल्यातरी अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देऊन पळून गेला.

 

या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 454/2022 भारतीय दंड विधान कलम 304 (अ) 279, 338, 427 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ), (ब), 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. थोरात हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button