अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: टेम्पो-दुचाकीचा अपघात; व्यावसायिकाचा मृत्यू

अहमदनगर- टेम्पो- दुचाकी धडकेत सुपा (ता. पारनेर) येथील हाॅटेल व्यावसायिक बाळासाहेब पवार यांचा मृत्यू झाला. आज (रविवार) नगर – पुणे महामार्गावर सुपा येथे हा अपघात झाला.

 

आज रविवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान एक मालवाहतुक टेम्पो हा सुपा नगर रोडवरील दौलत पेट्रोलपंपा समोर रस्ता ओलांडत असतांना त्याच वेळी सुपा येथील संदीप उद्योग समुहाचे बाळासाहेब पवार हे पवारवाडीकडून हॉटेलवर येत असतांना टेम्पो व दुचाकीची धडक झाली. यात पवार हे गंभीर जखमी झाले होते.

 

त्यांना तेथील स्थानिक व्यावसायिक व रहिवाश्यांनी ताबडतोब सुपा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु परिस्थिती थोडी गंभीर वाटल्याने पवार परिवाराने त्यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

 

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतांना सांयकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली अशी माहिती सुपा पोलिसांनी दिली. बाळासाहेब पवार हे सुप्यातील हॉटेल व्यावसायिक होते. त्यांच्या जाण्याने सुपा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button