अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ट्रक-कारचा अपघात; एकाच कुटुंबातील तिघे…

अहमदनगर – जामखेड शहरापासून 6 किलोमीटर अंतरावरील सौताडा घाट येथे देवीच्या मंदिराच्या जवळ एक सिमेंटचा भरलेला ट्रक व व्हॅगनार कार यांचा खड्ड्यामुळे अपघात झाला. यात एका कुटुंबातील तिघे जखमी झाले आहेत. गाडीमध्ये अडकलेल्या जखमीस तब्बल तीन तासानंतर जेसीबी व क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.

 

महेश विद्यासागर देशमुख (44), त्यांची पत्नी मंजू महेश देशमुख (40) व त्रिविद महेश देशमुख ( 10, रा. सर्व बीड ) अशी जखमींची नावे आहेत.

 

यात सिमेंटचा ट्रक व्हॅगनार गाडीवरती पडल्याने गाडी खाली दबली गेली. संजय कोठारी यांनी सर्वांच्या अगोदर घटनास्थळी दाखल होत मदत करण्यास सुरवात केली. त्यांनी व एका तेथून जाणार्‍या मिलिटरीच्या जवानानेे गाडीच्या काचा फोडून मुलगा आणि पत्नीस बाहेर काढले व महेश देशमुख यांचे दोन्ही पाय दोन्ही गाडीच्या मध्ये अडकल्याने त्यांना सर्वांनी मिळून तीन तास शर्तीच्या प्रयत्नाने बाहेर काढले व जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button