अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर ब्रेकींग : ट्रक ट्रेलरचा भीषण अपघात; दोन ठार

अहमदनगर- माल वाहतूक करणार्‍या दोन ट्रक ट्रेलरची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन वाहनचालक जागीच ठार झाले. संतोष भाऊ राख (रा. हतोला, ता. आष्टी, जि. बीड) आणि सुनिल हरिदास जायभाये (रा जायभायेवाडी ता. जामखेड जि. अहमदनगर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

लोणी रोडवर साई वीरा पेट्रोल पंपानजीक हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

आज विजयादशमीच्या दिवशी भल्या पहाटे ही घटना घडली. कोल्हारच्या दिशेने जात असलेले ट्रक ट्रेलर (क्रमांक एम. एच. 23 ए. यु. 2349 ) आणि लोणीच्या दिशेने जात असलेले ट्रक ट्रेलर (क्रमांक एम. एच. 46 ए. आर. 2882)

या दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. दोन्ही वाहनांच्या अग्रभागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

घटनेची खबर मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले.

जखमींना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही मोठ्या वाहनांची धडक झाल्याने कोल्हार-लोणी रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होऊ लागली. तात्काळ क्रेनच्या साहाय्याने वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली व वाहतूक सुरळीत करण्यात आली. सदर घटनेसंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button