अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दोन दुचाकीची धडक; एक ठार, एक जखमी

अहमदनगर- दोन दुचाकीच्या धडकेत एक तरूण ठार तर दुसरा जखमी झाला आहे. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात हा अपघात झाला.

 

या अपघातात दुचाकीस्वार अमोल अशोक दिघे (वय 31 वर्ष, रा. तळेगाव दिघे) हा तरूण ठार झाला. तर दुसरा दुचाकीस्वार अमोल निवृत्ती दिघे हा तरूण जखमी झाला.

 

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे शिवारात हॉटेल आराध्या नजीक बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. तळेगाव दिघे शिवारातील हॉटेल आराध्या नजीक दोन दुचाकींची धडक होत अपघात झाला.

 

दरम्यान दोघाही तरूणांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच अमोल अशोक दिघे या तरूणाचा मृत्यू झाला होता. अमोल अशोक दिघे या तरूणाच्या अपघाती मृत्यूने तळेगाव दिघे गावावर शोककळा पसरली असून गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संगमनेर तालुका पोलीस अपघाताच्या या घटनेचा तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button