अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दोन कारचा भीषण अपघात; चार ठार, पाच जखमी

अहमदनगर- कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणार्‍या कारला धडकून झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला. 5 जण जखमी झाले आहे. चौघेही मयत बजाजनगर (वाळूज ता. गंगापूर) येथील आहेत. नगर-औरंगाबाद महामार्गवर गंगापूर तालुक्यातील कायगाव नजिक हा अपघात झाला.

 

याबाबत माहिती अशी की, अहमदनगरहून औरंगाबादकडे बजाजनगर (वाळूंज) येथीलव चौघा व्यावसायिक मित्रांची एक कार (एमएच 20 सीएस 5982) जात होती. रात्री साडेआठच्या सुमाारस कायगावजवळील वळणाचा अंदाज न आल्याने ही कार दुभाजक ओलांडून समोरुन नगरच्या दिशेने जाणार्‍या कारवर धडकली.

 

धडक इतकी भीषण होती की चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रावसाहेब मोटे (वय 56), सुधीर पाटील (वय 45), भावसिंग गिरासे व रतन बेडवाल (38, चौघेही रा. वाळूज महानगर) अशी मयताची नावे आहेत

 

अपघातातील दुसर्‍या कारमधील (एमएच 27 बीझेड 3889) शशिकला कोराट (वय 70), सिद्धार्थ जंगले (वय 24), हेमंत जंगले (वय 55), छाया जंगले (वय 35), शंकुतला जंगले (व 70) हे पाच जण जखमी झाले. या कारमधील प्रवासी अमरावतीहून श्रीक्षेत्र देवगड येथे दर्शनासाठी मुक्कामी जात होते. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button