अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दुचाकी-टँकरच्या भीषण अपघातात दोन ठार; एक जखमी

अहमदनगर- दुचाकी व टँकर अपघातात दोघांचा मृत्यू झाला असुन एक जण जखमी झाला आहे. पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील कन्हैय्या कंपनी जवळ मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना झाली.

 

या अपघात दुचाकी चालक निलेश गणेश रासकर (वय 30) व कांताराम भिका भामरे (वय 53) हे जबर जखमी होऊन उपचारापूर्वी मृत झाले. तसेच संपत नामदेव भांमरे (वय 30) जखमी झाले. याबबत संपत भामरे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

 

यात म्हटले आहे की, आम्ही तिघे निघोज येथून शिरुरला जाण्यासाठी निघालो असता कन्हैया कंपनीकडे येणारा टँकरला दुचाकीची मागून धडक बसली. टँकर चालकाने वळतांना ईशारा न दिल्याने हा अपघात झाला. नीलेश रासकर व कांताराम भांबरे यांना शिरुर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला.

 

सदर अपघात प्रकरणी पोलीसांनी टँकर चालक अक्षय लंके यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. याबाबत हेडकॉन्स्टेबल पी. एच. डहाळे अधिक तपास करीत असून पोलीस उपअधीक्षक कातकाडे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी अपघात स्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button