अहमदनगर ब्रेकींग: स्विफ्ट कारच्या धडकेत दोघे ठार

अहमदनगर- भरधाव वेगाने जाणार्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने दोघे जण ठार झाले. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावरील बाह्य वळण रस्त्यावर मालपाणी उद्योग समूह जवळ घडली.
एम एच 14 जी एच 0834 या क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार भरधाव वेगाने नाशिक पुणे महामार्गावरून जात होती. ही कार बाह्य वळण रस्त्यावरून जात असताना कार चालकाने रस्त्यावरील दुभाजकाला लावलेले बेरेकेट उडवुन दिले. या अपघातात गिरिजा मुनसी तुरीया (वय 52) व सुरेश चेतु खैरवार (वय 55) या दोघांना कारने जोराची धडक दिली. या धडकेत दोघांचा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला.
याबाबत अमोल सुभाष बनसोडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी निशकांत संजय घोडेकर )रा पंचवटी, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 55/2022 भारतीय दंड संहिता कलम 304 (अ), 279, 338 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक महाले करत आहे.