अहमदनगर ब्रेकींग: कार-बसचा अपघातात दोन शिक्षक ठार, एक जखमी

अहमदनगर- धोत्रे फाटा (ता. पारनेर) येथे बस आणि कारचा अपघात होऊन. यात अकोले तालुक्यातील नाचणठाव येथील कन्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा मृत्यु झाला. ही घटना शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
यात दादाभाऊ नामदेव बर्वे (वय 52 रा. कोतुळ ता. अकोले) व ईश्वरचंद पोखरकर (वय 51 रा. नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे) अशा दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर यातील अविनाश पवार (रा. कोतुळ) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही तिघे शैक्षणिक कामानिमित्त नगर येथे गेले असता काम आटोपल्यानंतर माघारी परतत असतांना हा अपघात घडला. घटनेनंतर दोघांना टाकळी ढोकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले. ही घटना अकोले तालुक्यात समजली असता सर्वांना सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली.