अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दोन दुचाकीच्या भीषण अपघातात…

अहमदनगर: दोन दुचाकीस्वारांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये दोन्ही दुचाकीवरील चौघांना जबर मार लागला असून यामध्ये दोन्ही दुचाकीचे नुकसान झाले आहे.

 

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव कॉलेज परिसरातील नेवासा रोड या ठिकाणी हा अपघात झाला आहे.

 

यातील दोन तरुण घोगरगाव येथील व दोघे श्रीरामपुर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. दोघे ही वाहन धारक भरधाव वेगात असल्याने जोराचा अपघात होऊन मोठा आवाज आल्याने परीसरातील नागरीक मदतीसाठी आले.

 

यामधुन काही नागरीकांनी रूग्णवाहीका तसेच पोलिस प्रशासन यांना कळविली. यावरून पोलिस नाईक किरण पवार यांनी भेट देत जखमी व्यक्तींना वैदयकिय उपचारासाठी पि एम टि या ठिकाणी हलविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button