अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरूण ठार

अहमदनगर- नगर-मनमाड रोडने नगरच्या दिशेने दुचाकीवर येणार्या दोन तरूणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार दुपारी घडली.
या अपघातात बालाजी रवींद्र गुळवे (वय- 34 रा. नांदगाव शिंगवे), राजु शिवाजी इंगळे (वय- 28 रा. श्रीरामपूर) मयत झाले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
Advertisement
बालाजी व राजु हे दोघे तरूण त्यांच्या दुचाकीवरून नगर-मनमाड रोडने नगरच्या दिशेने येत होते. ते नांदगाव शिंगवे येथील बस स्थानकाजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघात ऐवढा भीषण होता की दोघांचा डोक्याला गंभीर मार लागला होता.
Advertisement
त्यांना रूग्णवाहिकेतून तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतू उपयोग झाला नाही. तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.