अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: बस-दुचाकीच्या अपघात महिला ठार

अहमदनगर- एसटी बस-दुचाकी अपघातात महिला जागीच ठार झाली असून एक जण जखमी झाला आहे. ताराबाई अर्जुन कोळेकर (वय ५०रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

अर्जुन येधु कोळेकर (वय ५५) व पत्नी ताराबाई अर्जुन कोळेकर (वय ५०) हे संध्याकाळी साडे सहा वाजता शिरूर वरून दुचाकी गाडीने राळेगण कडे येत असताना शिरूर ओतूर या एस टी बसला ओव्हर टेक करत असताना अपघात झाला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. पती बाजूला उडून पडल्याने किरकोळ दुखापत झाली. स्थानिक हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button