अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: वाहन धडकेत तरूणाचा मृत्यू

अहमदनगर- अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू झाला आहे. अरविंद कचरू मुसमाडे (वय 37) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील असून त्याला राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे धडक बसून मृत्यू झाला.

 

रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तांभेरे येथील परंतु कोल्हार शिवारात राहत असलेल्या अरविंद कचरू मुसमाडे हा युवक कोल्हार येथून कोल्हार तांभेरे रस्त्याने घराकडे जात असताना समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button