अहमदनगर ब्रेकींग: 45 वर्षीय व्यक्तिचा खून

अहमदनगर- 45 वर्षीय इसमाच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळी दिसून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
राहाता तालुक्यातील राजुरी गावातील हनुमान मंदिर परिसरात मधुकर पवार असे मयत इसमाचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास राजुरीचे पोलीस पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती लक्षात घेऊन फॉरेन्सिक विभागाची मदत घेतली.मयत मधुकर नारायण पवार हे राजुरी येथीलच रहिवाशी असून ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते.
गावात त्यांचेही कुणाशीही वाद नव्हते. त्यांच्या डोक्याला खोलवर जखम असल्याने पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त करून त्यांचा मुलगा राहुल पवार यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. पोस्ट मार्टेम रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा खून झाला आहे का हे स्पष्ट होऊ शकणार आहे.