अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: विश्वास संपादन करुन कांदा व्यापार्‍याला 50 लाखाला गंडा

अहमदनगर- बेंगलोर येथील दोघा व्यापार्‍यांनी संगमनेरातील कांदा व्यापार्‍याचा विश्वास संपादन करुन सुमारे 50 लाख रुपयांना फसविल्याचा प्रकार घडला आहे.

 

कांदा व्यापार्‍याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या असून त्यानुसार पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

याह्याखान अय्युबखान पठाण हे संगमनेरचे कांदा व्यापारी आहे. बेंगलोर व्यापारी शिवकुमार सनाफ (जि. के. तमन्नगौडा रा. 958 ब्लॉक फस्ट गेट सब मार्केट ए. पि. एम. सि, यार्ड दासनपुरा बेंगलोर) याने याह्याखान पठाण यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून कांदा माल उचलला. 20, 21 व 25 जानेवारी 2021 या दरम्यान नेलेल्या मालाची 29 लाख 1 हजार 176 रुपये रक्कमेची पठाण यांनी सनाफ यांच्याकडे वारंवार मागणी केली.

 

मात्र रक्कम मिळाली नाही. आपली फसवणूक झाली. त्यामुळे पठाण यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्याकडे तक्रार अर्ज केला. या तक्रारीबाबत 31 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याह्याखान अय्युबखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवकुमार सनाफ याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 774/2022 भारतीय दंड संहिता 406, 420 प्रमाणे दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.

 

तसेच अब्दुल आलम भाई (रा. जीवन ट्रेडर्स, मार्केट यार्ड बेंगलोर) याने देखील याह्याखान अय्युबखान पठाण (रा. मोगलपुरा, संगमनेर) यांच्याकडून कांदा माल 3 जून 2022 व त्यानंतर वेळोवेळी पाठविलेल्या मालाचे एकूण 20 लाख 2 हजार 797 रुपये दिले नाही. पठाण यांनी अब्दुल आलम भाई याच्याकडे वारंवार कांदा मालाची रक्कम मागितली. मात्र ती मिळाली नाही.

 

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने पठाण यांनी अब्दुल आलम भाई याच्याविरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीबाबत 31 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर अब्दुल आलम भाई याच्याविरोधात याह्याखान अय्युबखान पठाण यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 775/2022 भारतीय दंड संहिता कलम 406, 420 प्रमाणे दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाणे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button