अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: व्यावसायिकाचे बंद घर फोडून सात लाख चोरले

अहमदनगर- नगर शहरातील कोर्टगल्लीत ऑप्टीकल नावाचे चष्माचे दुकान असलेल्या व्यवसायिकाचे सात लाख रूपये चोरीला गेल्याची घटना घडली आहे. बंद घर फोडून कपाटातून ही रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. शांतीलाल गणेशरामजी चौधरी (वय 33 रा. विनायकनगर) असे या व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शांतीलाल चौधरी व त्यांचे मेव्हुणे कांतीलाल चौधरी यांचे दुकान आहे. शांतीलाल हे कांंतीलाल यांच्याकडे राहत असून त्यांची पत्नी व मुलगा मुळगावी अर्जी (राज्यस्थान) येथे राहतात. दरम्यान शांतीलाल यांचा मुलगा आजारी असल्याने ते मुळ गावी गेले होते. मुलगा मयत झाल्याने ते ते तिकडे असताना 25 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता शांतीलाल यांचे मेव्हुणे कांतीलाल यांनी त्यांना फोन करून सांगितले की,सकाळी नऊ वाजता घराला कुलूप लावून आम्ही सर्व जण दुकानात गेले होतो, रात्री 10 वाजता घरी आलो तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले.

 

घरात चोरी झाल्याचे दिसत आहे’. माहिती मिळताच शांतीलाल 27 ऑगस्ट रोजी विनायकनगर येथील घरी आले. यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button