अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पतीसोबतचे भांडण मिटविणाऱ्याचा विवाहितेवर अत्याचार

अहमदनगर- नगर शहरात आई वडिलांकडे राहणाऱ्या विवाहितेचे पतीसोबत झालेले भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी करणारा तानाजी कारभारी सातपुते (रा. उक्कडगाव ता. श्रीगोंदा) यानेच विवाहितेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

 

21 डिसेंबर, 2022 रोजी घडलेल्या या घटनेची फिर्याद 27 डिसेंबर, 2022 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सातपुते विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पतीसोबत भांडण झाल्याने फिर्यादी नगर शहरात आई-वडिलाकडे राहत होत्या. तेथे तानाजी सातपुते आला व तो फिर्यादीला म्हणाला,‘आपण तुझे व तुझ्या नवर्‍याचे भांडण मिटवुन घेवू, त्यासाठी आपल्याला शिक्रापुर (जि. पुणे) तालुक्यात राहत असलेल्या तुझ्या भायाकडे जावे लागेल’. फिर्यादीने त्याच्यावर विश्‍वास ठेऊन त्या त्याच्यासोबत गेल्या.

 

दरम्यान तानाजीने फिर्यादीला त्यांच्या भायाकडे न नेता एका लॉजवर नेले. तेथे त्याने फिर्यादीच्या इच्छेविरूध्द अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने 27 डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तानाजी सातपुते विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button