अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: भरदिवसा व्यापाऱ्याची रोकड पळवली

अहमदनगर- बाभळेश्वर (ता. राहाता) येथून भरदिवसा सोनगावच्या व्यापार्‍याची गाडी अडवून तीन लाखांची रोकड पळवून नेल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

 

याबाबतची माहिती अशी की, सोनगाव ता. राहुरी येथील गणेश नंदलाल दरक यांची टाटा मेघा गाडी घेऊन त्यांचा चालक श्रीरामपूरकडे खाद्यतेल आणण्यासाठी जात होता. त्याच्याकडे तेलाचे पेमेंट करण्यासाठी तीन लाख रुपये व्यापारी श्री. दरक यांनी दिले होते.

 

मात्र बुधवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास चालक बाभळेश्वरच्या विद्या विकास पब्लिक स्कुलच्या पुढे श्रीरामपूरकडे जात असताना पाठीमागून पांढर्‍या रंगाची विनानंबर प्लेटची स्कोडा कार आली. त्यातील तिघांनी कट मारल्याचे कारण सांगत कार आडवी लावून चालक श्री. पिंपळे यांना मारहाण केली व गाडीच्या डिकितील तीन लाखांची रोकड घेऊन ते श्रीरामपूर रस्त्याने पसार झाले.

 

व्यापारी श्री.दरक यांच्या तक्रारीवरून अज्ञात तिघांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री. दरक हे अनेक वर्षांपासून श्रीरामपूर येथून खाद्यतेल व गुळाची खरेदी करीत आहेत मात्र पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button