अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर सह राज्याला हादरवणारी घटना ! .. स्वत:ची चिता रचून तरुणाने केली आत्महत्या

अहमदनगर सह राज्याला हादरवणारी घटना ! .. स्वत:ची चिता रचून तरुणाने केली आत्महत्या

नेवासा तालुक्यातील चांद्यापासून जवळच असलेल्या लोहारवाडी शिवारात 27 वर्षीय तरुणाने स्वतःच स्वतःचे सरण (चिता) रचून त्यावर स्वतःला बांधून घेवून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील चांद्या जवळील लोहारवाडी शिवारात विरळ वस्ती असलेल्या भागातील गट नं. 41 मधील वस्तीवर राहत असलेले साहेबराव पुंड यांचा मुलगा अनिल साहेबराव पुंड (वय 27) याने मध्यरात्रीच्या सुमारास घरापासून काही अंतरावर शेतातील लाकडे जमा करुन स्वतःची चिता (सरण) रचली. त्यावर शेतातील ठिबक सिंचन संचाच्या नळ्या गोळा करुन त्या अंथरल्या.

स्वतःला तारेल्या साहायाने बांधून घेतले व पेटवून घेवून आत्महत्या केली. या घटनेविषयी सोनई पोलीस ठाण्यात प्राथमिक स्वरुपात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी अनिलचे आई-वडील बाहेरगावी गेलेले होते. या विचित्र आत्महत्यने परीसरात हळहळ व अनेक शंका व्यक्त होत आहेत.

दरम्यान श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके रांनी घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत मार्गदर्शन केले. शनिवारी रात्री 1.30 वाजता मरत अनिल पुंड याने आपल्रा मोबाईलवरुन बहीण व मावशीला आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पाठविला होता.

चिठ्ठी लिहून ठेवली असली तरी या आत्महत्येबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत. आत्महत्येच्या या घटनेने चांदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button