अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: फूस लावून अल्पवयीन मुलीला तरूणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन्…

अहमदनगर- उपनगरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. तोफखाना पोलिसांनी अनिल गाडळकर (रा. रेल्वे स्टेशन रोड, नगर) या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी दहावीमध्ये असताना तिची चैतन्यसोबत मैत्री झाली होती. त्यांच्या मैत्रीची माहिती फिर्यादी यांना समजताच त्यांनी याला विरोध केला होता. चैतन्य हा फिर्यादी राहत असलेल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये येवून गेला होता.

 

तेव्हा फिर्यादी यांनी त्याला फोन करून समजून सांगितले असता त्याने फिर्यादीला मारून टाकण्याची धमकी दिली होती. यानंतरही चैतन्य याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला मोबाईल घेवून दिला.

 

फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे चैतन्य गाडळकर याला माहिती असून देखील त्याने तिला फुस लावून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी जवळीक साधल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button